मुंबई पोलीस, महाराष्ट्राची बदनामी करणार्‍या भाजपाने

Foto
जनतेची माफी मागावी- गृहमंत्री देशमुख
सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी एम्सचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार सुशांतने आत्महत्याच केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.सुशांतच्या प्रकरणावरून मुबंई पोलीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची षडयंत्र रचून बदनामी केली. त्यामुळे भाजपाने राज्यातील जनतेची आणि मुबंई पोलिसांची माफी मागावी. अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी योग्य रीतीने तपास केला होता. पण या तपासाबाबत तसेच सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजपासह काही प्रसिद्धी माध्यमांनी केला होता. वास्तविक मुबंई पोलिसांनी केलेल्या तपासाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत कौतुक केले होते. पण काही जणांनी महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते. तसेच बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ही शंका उपस्थित करत मुबंई पोलिसांच्या तपासावर शंका व्यक्त केली होती. आता पांडे यांनी राजीनामा देऊन बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आता पांडे यांचा प्रचार करणार का असा प्रश्न गृहमंत्री देशमुख यांनी उपस्थित केला. एम्सने सुशांतच्या बाबतीत अहवाल सीबीआयला सोपविला आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याच्या शरीरात विष आढळून आलेले नाही. त्याची हत्या नसून त्याने आत्महत्याच केलेली आहे. त्यामुळे आता सीबीआयने तपासाचा अहवाल लवकर जाहीर करावा. अशी मागणी देशमुख यांनी केली. राज्यात 5 वर्ष सत्तेत राहून मुख्यमंत्रीपद भोगलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची व मुबंई पोलिसांनी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांनी आता माफी मागावी अशी मागणीही गृहमंत्री देशमुख यांनी केली.
माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे
मुंबई पोलीस दल व आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल 80 हजार बनावट खाती उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्‍तांनी सायबर सेलला याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून सायबर सेलने या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे नोंदवले आहेत. याबाबत दखल प्रशासनाने घेतली असून पोलीस आयुक्तांनी सायबर सेलला याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker